Hyderabadi Chicken Gravy Recipe in Marathi
Hyderabadi Chicken Gravy Recipe in Marathi
साहित्य:
५०० ग्राम चिकन
१ मोठा कांदा
२ टोमाटो (उकडून)
२ टी स्पून लाल मिरची पावडर
१ टी स्पून गरम मसाला
१/२ टे स्पून धने-जिरे पावडर
६ बदाम (भिजवून)
२ टे स्पून दुध व १० कड्या केसर (भिजत ठेवा)
१ टे स्पून फ्रेश क्रीम
१/२ वाटी दही
१/२ टी स्पून हळद
मीठ चवीने
Hyderabadi Chicken Gravy Recipe in Marathi
चिकन मुरवून ठेवण्यासाठी मसाला वाटुन:
१ मध्यम आकाराचा कांदा
१०-१२ लसूण पाकळ्या
१” आले तुकडा
४ हिरव्या मिरच्या
१ टे स्पून खसखस (भाजून)
१/२ कप कोथंबीर
१/४ कप पुदिना पाने
२ टे स्पून तूप
Hyderabadi Chicken Gravy Recipe in Marathi
कृती: कांदा, आले-लसूण, हिरवी मिरची, कोथंबीर, पुदिना पाने खसखस वाटून घ्या. टोमाटो उकडून, साले काढून मिक्सरमध्ये वाटुन घ्या. कांदा बारीक चिरून घ्या. भिजलेले बदाम वाटून घ्या. केसर कोमट दुधामध्ये भिजत ठेवा.
Hyderabadi Chicken Gravy Recipe in Marathi
चिकन धुवून घ्या. चिकनला वाटलेला मसाला, दही, हळद व मीठ लाऊन मिक्स करून १५ मिनिट बाजूला ठेवा.
कढईमधे तूप गरम करून कांदा घालून गुलाबी रंगावर परतून घ्या. मग त्यामध्ये टोमाटो प्युरी घालून ५ मिनिट परतून त्यामध्ये मुरत ठेवलेले चिकन, लाल मिरची पावडर, धने=जिरे पावडर, गरम मसाला, मीठ चवीने घालून दोन-तीन मिनिट परतून घेवून २ कप गरम पाणी घालून कढईवर झाकण ठेवून मंद विस्तवावर चिकन शिजत ठेवा.
Hyderabadi Chicken Gravy Recipe in Marathi
चिकन शिजलेकी त्यामध्ये फ्रेश क्रीम, वाटलेले बदाम, केसरचे दुध घालून मिक्स करून एक चांगली उकळी आणा.
गरम गरम चिकन चपाती बरोबर किंवा पराठ्या बरोबर सर्व्ह करा.
Hyderabadi Chicken Gravy Recipe in Marathi
अभिजीत राजपूत

Comments
Post a Comment