गाजर गुलकंद बॉल्स रेसिपी मराठी

🥕गाजर गुलकंद बॉल्स:-


👇👇

साहित्य :-

गाजर, तूप, मावा, किसलेलं खोबरं, गूळ, गुलकंद, वेलचीपूड, ड्रायफ्रूट्स, मीठ

👨‍🍳 कृती :-

1) पाव किलो गाजर स्वच्छ धुऊन किसून घ्यावी.

2) कढईत 2 चमचे साजूक तुप घालून त्यावर 50 ग्रॅम मावा परतून प्लेटमध्ये काढून घ्यावा.

3) कढईत गाजराचा किस मध्यम लालसर होईपर्यंत परतावा व त्यातच पाव वाटी किसलेले खोबरे परतावे.

4) त्यात परतलेला मावा, पाव वाटी पावडर गूळ, पाव वाटी गुलकंद, 1 मोठा चमचा वेलचीपूड, किसलेले ड्रायफ्रूट्स व दोन चिमूट मीठ घालून सुके होईपर्यंत परतावे.

5) मिश्रण थाळीत काढून थोडं थंड होताच त्याचे बॉल्स करावे. 


अभिजीत राजपूत 🍱🍱

Comments