दुधी भोपळा बर्फी मराठी रेसिपी

दुधी भोपळा बर्फी:-


साहित्य:2 कप किसलेला दुधी - 1 लिटर दुध - 1 कप खवा - 1/2 कप साखर - 1 चमचा वेलची पावडर

कृती:-

▪  जाड बुडाच्या पातेल्यात दुध आणि दुधी घालून उकळावा. 

▪ दुध अर्धे झाले की त्यात साखर घालावी. 

▪ मिश्रण जाडसर होईपर्यंत सारखे हलवत राहा म्हणजे खाली चिकटणार नाही. 

▪ वरील मिश्रणात खवा घालून चांगले एकजीव करून घ्या. 

▪ पाणी सुटायला लागले की आधीच तुपाचा हात लावून ठेवलेल्या अॅल्युमेनियमच्या भांड्यात हे मिश्रण ओता. 

▪ वेलची पावडर टाकून वरची सर्व चमच्याने एकसारखी सपाट करून घ्या. आणि त्यावर बारीक कापलेला सुका मेवा भुरभुरा. 

▪ मिश्रण थंड होण्यासाठी फ्रीज मध्ये ठेवा.

▪ साधारण तासाभराने बाहेर काढून चौकोनी तुकड्यात बर्फी कापा.

अभिजीत राजपूत  

Comments