चिकन मालवाणी रेसिपी मराठी
६०० ग्रॅम चिकन
मॅरीनेट करण्यासाठी मसाला-
१/२" आलं + १०-१२ लसून पाकळ्या+ १/२ कप कोथिंबीर + १/२ टीस्पून हळद + १/४ टीस्पून गरम मसाला
रश्याच्या वाटणासाठी मसाला -
१ मध्यम कांदा उभा चिरून + १/२ कप सुकं खोबरं + २ टीस्पून धने + १/४ टीस्पून शहाजिरे + ८-१० मिरी + ४ लवंग + १ वेलची + २" दालचिनी
१ मध्यम कांदा बारीक चिरून
१/२ कप टोमॅटो प्युरी
२ टीस्पून लाल तिखट
मीठ चवीप्रमाणे
वरून पेरण्यासाठी कोथिंबीर
कृती :
१. आले-लसूण-कोथिंबीर मिक्सर वर बारीक वाटून घ्या. चिकनला हि पेस्ट ,हळद, गरम मसाला आणि मीठ लावून फ्रीज मध्ये ४-५ तास मॅरीनेट करून ठेवा.
२. पातेल्यात १ टेबलस्पून तेलात उभा चिरलेला कांदा, धने, शहाजिरे, मिरी,लवंग,दालचिनी आणि वेलची परता. कांदा गोल्डन ब्राऊन झाल्यावर सुकं खोबरं घालून ब्राऊन रंग येईपर्यंत खरपूस भाजून घ्या.
३. मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरवर थोडं पाणी घालून एकदम बारीक वाटून घ्या.
४. पातेल्यात तेल गरम करून बारीक चिरलेला कांदा गोल्डन ब्राऊन रंगावर परता. २ टीस्पून लाल तिखट घाला. मॅरीनेट केलेले चिकन घालून परता.
५. त्यात १ कप पाणी घाला. १०-१५ मिनिटे चिकन चांगले शिजू द्या. चिकन शिजले कि नंतर टोमॅटो प्युरी घाला. वाटण घालून सगळं नीट मिक्स करा.
६. गरज असेल तर आणखीन मीठ घालून १ उकळी काढा. वरून कोथिंबीर पेरून सर्व्ह करा.

अभिजीत राजपूत
Comments
Post a Comment