केळी दहीवडा रेसिपी मराठी

केळी दहीवडा :-


साहित्य :-

1 डझन कच्ची केळी

पाऊण वाटी शिगाड्याचं पीठ

राजगिऱ्याचं पीठ

आर्धी वाटी दाण्याचं कुट

10-12 हिरव्या मिरच्या

खाण्याचा सोडा

साखर

जिऱ्याची पूड

तीन वाट्या दही

कोथिंबीर

मीठ (चवीनुसार)

कृति:-

केळी सोलून कुकरमध्ये उकडून घ्यावी. 

थंड झाल्यावर वाटून त्यात जिरंपूड,चवीप्रमाणे मीठ व वाटलेल्या मिरच्या घालाव्यात. 

या मिश्रणाचे गोल चपटे वडे करून घ्यावेत. 

शिंगाडा आणि राजगिऱ्याचं पीठ पाण्यात घालून पातळ करावं आणि तयार केलेले वडे या पिठात बुडवून काढून तळावेत. 

तळलेले वडे पाण्यात घालून बाहेर काढून हलक्या हाताने दाबून पाणी काढून टाकावं. 

दही थोडं घुसळून घेऊन त्यात वाटलेलं आलं,साखर,मीठ,चिरलेली कोथिंबीर घालावी. 

नंतर तयार केलेले वडे या दह्यात सोडावेत. नेहमीच्या दही वड्यांप्रमाणे थोडं लाल तिखट, चाट मसाला वरून भुरभुरून सर्व करावेत.

अभिजीत राजपूत 🙏🙏

Comments