आरोग्याला पूरक असा बीटाचा हलवा:-
गाजर, बीट याने रक्तवाढ होते, ते आरोग्यदायी असतात हे आपण सगळे जाणतो. मात्र काही लोकांना बीटाची चव आवडत नाही. मग बीट खायचं नाही का? तर नाही... बीट चविष्ट करून खायचं. कसं ते आपण पाहू:
साहित्य: बीट, साखर, खवा, वेलची पूड, मनुका, चारोळी, तूप.
कृती:
कच्चे बीट साल काढून किसावेत. तूप गरम करून कीस परतून त्यात पाणी शिंपडून, साखर घालून मंद आचेवर वाफवून घ्या.
मिश्रणाचा गोळा व्हाला लागला की नंतर कुस्करलेला खवा, वेलची पूड, मनुका, चारोळी घालून ढवळून घ्या.
ताटाला तुपाचा हात लावून मिश्रण पसरवून घ्या. आणि आवडीप्रमाणे आकारात कापा.
अभिजीत राजपूत
Comments
Post a Comment